Aali Aali Ho Bhagabai

तिनं साडी आणा म्हंटली... आणली!
तिनं चोळी आणा म्हंटली... आणली!
तिनं नथ आणा म्हंटली... आणली!
तिनं बुगडी आणा म्हंटली... आणली!

अहो दाजिबाच्या वाड्यात गडबड झाली,
माडीवरची मंडळी खाली आली,
आली आली हो भागाबाई,
आली आली हो भागाबाई!

भागाबाई बोलली हटून,
आणि लग्नाला बसली नटून,
तिथं नवर्याचा पत्त्याच नाही,
आली आली हो भागाबाई!

भागाबाई निघाली जत्रंला,
शंभर रुपयं बांधलं पदराला,
तिथं मांजर आडवंच जाई,
आली आली हो भागाबाई!

भागाबाई पडली इरेला,
ह्यो बापई नवरा ठरिवला,
त्याच्या तोंडाला नाकच नाही,
आली आली हो भागाबाई!

अशी आमुची भागाबाई शहाणी
तिच्या जल्माची झाली कहाणी
कडं पात्तूर एकलीच र्हाई
आली आली हो भागाबाई!



Credits
Writer(s): Jagdish Khebudkar, Ram Kadam
Lyrics powered by www.musixmatch.com

Link