Ghan Rani

घन रानी
घन रानी, साजणा
घन रानी
घन रानी, साजणा

मी कशी तुझ्यासवे
मी कशी तुझ्यासवे
चुकले वाट रे
चुकले वाट रे, सांग ना
घन रानी
घन रानी, साजणा
घन रानी
घन रानी, साजणा

भिरभिर वाऱ्याची
थरथर पाण्याची
अवखळ सजणी मी
मनभर गाण्याची

तरी बाई सूर नवनवे
सुखद मधुर वाटतात हवे
या मना

घन रानी
घन रानी, साजणा
घन रानी
घन रानी, साजणा

मधुमय समय असा
बहरुन कुंज हसे
तरळत गंध नवा
वलते लावी पिसे

इथे तिथे गोड निळेपण
बावरते मन साद घालि कोण?
यौवना

घन रानी
घन रानी, साजणा
घन रानी
घन रानी, साजणा

किती अधीर-अधीर भाषा प्रीतीची
किती अधीर-अधीर भाषा प्रीतीची
मन माझे, मन माझे, मन बोलत नाही गं माझे
किती लाजे, किती लाजे, वेडे लाजरे मन गं माझे

एक शपथ-शपथ त्याला भीतीची
एक शपथ-शपथ त्याला भीतीची
हृदया रे
अदया रे, बोल ना

घन रानी
घन रानी, साजणा
घन रानी
घन रानी, साजणा

मी कशी तुझ्यासवे
मी कशी तुझ्यासवे
चुकले वाट रे
चुकले वाट रे, सांग ना
घन रानी
घन रानी, साजणा
घन रानी
घन रानी, साजणा



Credits
Writer(s): Shanta Shelake, Shridhar Phadke
Lyrics powered by www.musixmatch.com

Link