Gheuniya Pancharati & Aarti Sai Baba

घेउनिया पंचारती, करू बाबांची आरती
करू साईंची आरती, करू बाबांची आरती

उठा-उठा हो बांधव, ओवाळू हा रमाधव
साई रमाधव, ओवाळू हा रमाधव

करुनीया स्थिर मन पाहूं गंभीर हे ध्यान
साईचे हे ध्यान, पाहू गंभीर हे ध्यान

कृष्णनाथा दत्तसाई, जड़ो चित्त तुझे पाई
चित्त बाबांपाई, जडो चित्त तुझे पाई

आरती साईबाबा, सौख्य दातार जीवा
चरण रजातळीं द्यावा दासा विसांवा
भक्ता विसांवा
आरती साईबाबा

जाळूनिया अनंग सस्वरूपी राहे दंग
मुमुक्षुजना दावी निज डोळा श्रीरंग
डोळा श्रीरंग
आरती साईबाबा

जयामनी जैसा भाव, तया तैसा अनुभव
दावीसी दयाधना ऐसी तुझी ही माव
तुझी ही माव
आरती साईबाबा

तुमचे नाम ध्याता, हरे संसृती व्यथा
अगाध तव करणी, मार्ग दाविसी अनाथा
दाविसी अनाथा
आरती साईबाबा

कलियुगी अवतार सगुणब्रह्म साचार
अवतीर्ण झालासी, स्वामी दत्त दिगंबर
दत्त दिगंबर
आरती साईबाबा

आठा दिवसा गुरुवारी भक्त करिती वारी
प्रभुपद पहावया भवभय निवारी
भय निवारी
आरती साईबाबा

माझा निजद्रव्य ठेवा, तव चरणरज सेवा
मागणे हेचि आता तुम्हा देवाधी देवा
देवाधी देवा
आरती साईबाबा

इच्छित दिन चातक, निर्मल तोय निज सुख
पाजावे माधवा या सांभाळ आपुली भाक
आपुली भाक
आरती साईबाबा, सौख्य दातार जीवा
चरण रजातळीं द्यावा दासा विसांवा
भक्ता विसांवा
आरती साईबाबा



Credits
Writer(s): Mayuresh Pai
Lyrics powered by www.musixmatch.com

Link