Shabda Maala Pureshi Na Hoti

शब्दमाळा, शब्दमाळा पुरेशा न होती
स्पर्श सारेच सांगून जातो
शब्दमाळा पुरेशा न होती, स्पर्श सारेच सांगून जातो
लोचनांआड जातेस तेव्हा पापणीला तुझा रंग येतो
पापणीला तुझा रंग येतो
शब्दमाळा पुरेशा न होती

आर्त कोमेजलेल्या मनाची पाकळी-पाकळी खिन्न झाली
आर्त कोमेजलेल्या मनाची पाकळी-पाकळी खिन्न झाली
सांत्वनाच्या तुझ्या फुंकरीने प्राण लेवून आली नव्हाळी

एक हुंकार देतो दिलासा
एक हुंकार देतो दिलासा, एक झंकार गात्रांत गातो
लोचनांआड जातेस तेव्हा पापणीला तुझा रंग येतो
पापणीला तुझा रंग येतो
शब्दमाळा पुरेशा न होती

माळ वैराण निःश्वासताना रानपक्षी कसा गात होता
माळ वैराण निःश्वासताना रानपक्षी कसा गात होता
काळरात्रीसही सोबतीला रातराणी तुझा गंध होता

काल निःश्वासलेला तराणा
काल निःश्वासलेला तराणा, आज विश्वास देऊन जातो
लोचनांआड जातेस तेव्हा पापणीला तुझा रंग येतो
पापणीला तुझा रंग येतो
शब्दमाळा पुरेशा न होती

मोरपंखी खुणेसारखी तू
मोरपंखी खुणेसारखी तू, चित्त मोहून घेतो फुलोर
मोरपंखी खुणेसारखी तू, चित्त मोहून घेतो फुलोर
अभ्र दाटून आले तरीही तू ढगामागची चंद्रकोर

चांदण्याचा झुला हालताना
चांदण्याचा झुला हालताना जीव भोळा शहारून जातो
लोचनांआड जातेस तेव्हा पापणीला तुझा रंग येतो
पापणीला तुझा रंग येतो

शब्दमाळा पुरेशा न होती, स्पर्श सारेच सांगून जातो
लोचनांआड जातेस तेव्हा पापणीला तुझा रंग येतो
पापणीला तुझा रंग येतो
शब्दमाळा पुरेशा न होती



Credits
Writer(s): Yashvant Dev
Lyrics powered by www.musixmatch.com

Link