Aekada Haas Tu

एकदा हास तु, एकदा हास तु
हसत माझा मला परत दे श्वास तु
एकदा हास तु, एकदा हास तु
हसत माझा मला परत दे श्वास तु
एकदा हास तु...

ऐक आतातरी पूस ही आसवे
ऐक आतातरी पूस ही आसवे
बोल माझ्यासवे, बैस माझ्यासवे

विसर हे कालचे...
विसर हे कालचे करून आभास तु
हसत माझा मला परत दे श्वास तु
एकदा हास तु...

वेदनेला कुणी हाक मारू नये
वेदनेला कुणी हाक मारू नये
भेटलेल्या सुखा दूर सारू नये

का तुझा जाळशी?
का तुझा जाळशी? व्यर्थ मधुमास तु
हसत माझा मला परत दे श्वास तु
एकदा हास तु...

एकटे मी तुला आठवावे किती
एकटे मी तुला आठवावे किती
गीत वेडे तुझे गुणगुणावे किती

दे जरासा तुझा...
दे जरासा तुझा मधुर सहवास तु
हसत माझा मला परत दे श्वास तु
एकदा हास तु, एकदा हास तु
हसत माझा मला परत दे श्वास तु
एकदा हास तु...



Credits
Writer(s): Yashvant Dev, Jyoti Baaliga
Lyrics powered by www.musixmatch.com

Link