Naam Gheta Chala Aata

(चालली दिंडी पंढरीला, पंढरीला हो, पंढरीला)
(आषाढी एकादशीला चला हो होऊ पंढरीला)

नाम घेता चाला आता पंढरीची वाट
(विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल)
नाम घेता चाला आता पंढरीची वाट
(विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल)

डोळ्यानं पहावा चांद्रभागेचा तो थाट
डोळ्यानं पहावा चांद्रभागेचा तो थाट, पंढरीची वाट

नाम घेता चाला आता पंढरीची वाट
(विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल)
ए, नाम घेता चाला आता पंढरीची वाट

(चालली दिंडी पंढरीला, पंढरीला हो, पंढरीला)
(आषाढी एकादशीला चला हो होऊ पंढरीला)

विठू दर्शना सारे जाऊया
रूप डोळाभरून पाहूया
विठू दर्शना सारे जाऊया
रूप डोळाभरून पाहूया

दंग होऊन भजनी रंगूया
दंग होऊन भजनी रंगूया
भक्तिभावाने त्याला अळवूया
(भक्तिभावाने त्याला अळवूया)
(भक्तिभावाने त्याला अळवूया)

यात्रेसाठी भाविक येती गर्दी होते दाट
यात्रेसाठी भाविक येती गर्दी होते दाट, पंढरीची वाट

नाम घेता चाला आता पंढरीची वाट
(विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल)
नाम घेता चाला आता पंढरीची वाट

(चालली दिंडी पंढरीला, पंढरीला हो, पंढरीला)
(आषाढी एकादशीला चला हो होऊ पंढरीला)

पुंडलिक भक्त होऊनी गेला
आई-वडिलांच्या सेवेतच रमला
पुंडलिक भक्त होऊनी गेला
आई-वडिलांच्या सेवेतच रमला

देव स्वर्गीचा भूवरी आणला
देव स्वर्गीचा भूवरी आणला
कटी कर ठेवुनी उभा राहिला
(कटी कर ठेवुनी उभा राहिला)
(कटी कर ठेवुनी उभा राहिला)

स्पर्श होता चरणांचा धन्य झाली वीट
स्पर्श होता चरणांचा धन्य झाली वीट, पंढरीची वाट

नाम घेता चाला आता पंढरीची वाट
(विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल)
नाम घेता चाला आता पंढरीची वाट

(चालली दिंडी पंढरीला, पंढरीला हो, पंढरीला)
(आषाढी एकादशीला चला हो होऊ पंढरीला)

अशी ही पुण्य भूमी संतांची
तुकया, चोखा, नामदेवाची
अशी ही पुण्य भूमी संतांची
तुकया, चोखा, नामदेवाची

ओवी गाणाऱ्या त्या जनाईची
ओवी गाणाऱ्या त्या जनाईची
थोरवी आहे कान्होपात्रेची
(थोरवी आहे कान्होपात्रेची)
(थोरवी आहे कान्होपात्रेची)

अखंड नामाचा चाले गजर अफाट
अखंड नामाचा चाले गजर अफाट, पंढरीची वाट

नाम घेता चाला आता पंढरीची वाट
(विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल)
ए, नाम घेता चाला आता पंढरीची वाट

(चालली दिंडी पंढरीला, पंढरीला हो, पंढरीला)
(आषाढी एकादशीला चला हो होऊ पंढरीला)

डोळ्यानं पहावा चांद्रभागेचा तो थाट
डोळ्यानं पहावा चांद्रभागेचा तो थाट, पंढरीची वाट

नाम घेता चाला आता पंढरीची वाट
(विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल)
नाम घेता चाला आता पंढरीची वाट

(चालली दिंडी पंढरीला, पंढरीला हो, पंढरीला)
(आषाढी एकादशीला चला हो होऊ पंढरीला)
(चालली दिंडी पंढरीला, पंढरीला हो, पंढरीला)
(आषाढी एकादशीला चला हो होऊ पंढरीला)

(चालली दिंडी पंढरीला, पंढरीला हो, पंढरीला)
(आषाढी एकादशीला चला हो होऊ पंढरीला)
(चालली दिंडी पंढरीला, पंढरीला हो, पंढरीला)

Credits
Writer(s): Vitthal Shinde
Lyrics powered by www.musixmatch.com

Link