Are Devraya

अरे देवराया, माझा पाहू नको अंत
अरे देवराया, माझा पाहू नको अंत
फुलवशील कधी तू माझ्या जीवनी वसंत?
फुलवशील कधी तू माझ्या जीवनी वसंत?

अरे देवराया, माझा पाहू नको अंत
अरे देवराया, माझा पाहू नको अंत

विश्वविधाता तूचि, तूच सर्व काही
विश्वविधाता तूचि, तूच सर्व काही
तुझ्यावाचूनी जगाचे पान हलत नाही
तुझ्यावाचूनी जगाचे पान हलत नाही

निराकार निर्गुणची तू, रूप मूर्तिमंत
निराकार निर्गुणची तू, रूप मूर्तिमंत

फुलवशील कधी तू माझ्या जीवनी वसंत?
फुलवशील कधी तू माझ्या जीवनी वसंत?
अरे देवराया, माझा पाहू नको अंत
अरे देवराया, माझा पाहू नको अंत

प्रपंचाचा व्याप मोठा, जीवनी ना मेळ
प्रपंचाचा व्याप मोठा, जीवनी ना मेळ
तूच दाखवी विश्वाला मायेचा हा खेळ
तूच दाखवी विश्वाला मायेचा हा खेळ

जाणती हे मूढ सारे थोर साधु-संत
जाणती हे मूढ सारे थोर साधु-संत

फुलवशील कधी तू माझ्या जीवनी वसंत?
अरे देवराया, माझा पाहू नको अंत
अरे देवराया, माझा पाहू नको अंत

सुख आणि दुःखाचा हा चाले लपंडाव
सुख आणि दुःखाचा हा चाले लपंडाव
कुणी जगी असती रंक आणि कुणी राव
कुणी जगी असती रंक आणि कुणी राव

कसे जगावे जीवन...
कसे जगावे जीवन पडे पुन्हा भ्रांत
कसे जगावे जीवन पडे पुन्हा भ्रांत

फुलवशील कधी तू माझ्या जीवनी वसंत?
अरे देवराया, माझा पाहू नको अंत
अरे देवराया, माझा पाहू नको अंत

घडी, दो घडीचे वैभव, नश्वर ही काया
घडी, दो घडीचे वैभव, नश्वर ही काया
प्रभू श्री अनंता, ठेवी श्री कृपाछाया
प्रभू श्री अनंता, ठेवी श्री कृपाछाया

तंव भक्तीला अंतरलो हीच मनी खंत
तंव भक्तीला अंतरलो हीच मनी खंत

फुलवशील कधी तू माझ्या जीवनी वसंत?
अरे देवराया, माझा पाहू नको अंत
अरे देवराया, माझा पाहू नको अंत

फुलवशील कधी तू माझ्या जीवनी वसंत?
अरे देवराया, माझा पाहू नको अंत
अरे देवराया, माझा पाहू नको अंत
अरे देवराया, माझा पाहू नको अंत



Credits
Writer(s): Anant Patil, Madhurkar Pathak
Lyrics powered by www.musixmatch.com

Link