Ajan Amhi Tujhi Lekare

अजाण आम्ही तुझी लेकरे
अजाण आम्ही तुझी लेकरे
तू सर्वांचा पिता

नेमाने तुज नमितो, गातो
तुझ्या गुणांच्या कथा
तुझ्या गुणांच्या कथा
अजाण आम्ही तुझी लेकरे

सूर्य-चंद्र हे तुझेच देवा
तुझे गुरे-वासरे
तुझीच शेते, सागर, डोंगर

फुले, फळे, पाखरे
फुले, फळे, पाखरे
अजाण आम्ही तुझी लेकरे

अनेक नावे तुला तुझे रे
दाही दिशांना घर
अनेक नावे तुला तुझे रे
दाही दिशांना घर

करिशी देवा सारखीच तू
माया सगळ्यांवर
अजाण आम्ही तुझी लेकरे

खूप शिकावे, काम करावे
प्रेम धरावे मनी, प्रेम धरावे मनी

हौस एवढी पुरवी देवा
हीच एक मागणी, हीच एक मागणी
अजाण आम्ही तुझी लेकरे
तू सर्वांचा पिता

नेमाने तुज नमितो, गातो
तुझ्या गुणांच्या कथा
तुझ्या गुणांच्या कथा
अजाण आम्ही तुझी लेकरे



Credits
Writer(s): Kamalakar Vinayak Bhagwat, Sanjivani Marathe
Lyrics powered by www.musixmatch.com

Link