Kal Ratri Swapna Madhe

काल राती स्वप्नामध्ये
एक राजा आला, मज मोहून गेला
काल राती स्वप्नामध्ये
एक राजा आला, मज मोहून गेला

नवतीच्या त्या प्रीतीसाठी
नवतीच्या त्या प्रीतीसाठी
जीव ही माझा भारला
काल राती स्वप्नामध्ये
एक राजा आला, मज मोहून गेला

वेलीस गंध, गंधात मंद, धुंदावली फुले
स्पर्शात रंग, रंगात दंग ही केतकी झुले
वेलीस गंध, गंधात मंद, धुंदावली फुले
स्पर्शात रंग, रंगात दंग ही केतकी झुले

नाजूक तारा गोरा-मोरा
नाजूक तारा गोरा-मोरा
निलआकाशी जागला
काल राती स्वप्नामध्ये
एक राजा आला, मज मोहून गेला

प्रीतीत गीत, गीतात मित, ना पापणी हले
घेती मनात, मी त्या क्षणात त्याचीच जाहले
प्रीतीत गीत, गीतात मित, ना पापणी हले
घेती मनात, मी त्या क्षणात त्याचीच जाहले

लाज अबोली गाली आली
लाज अबोली गाली आली
प्रीत फुलोरा हासला

काल राती स्वप्नामध्ये
एक राजा आला, मज मोहून गेला
काल राती स्वप्नामध्ये
एक राजा आला, मज मोहून गेला



Credits
Writer(s): Shantaram Nandgaonkar, Ashok Govind Patki
Lyrics powered by www.musixmatch.com

Link