He Hasne Gulabi

हे हासणे गुलाबी, आता पुरेच झाले
हे हासणे गुलाबी, आता पुरेच झाले
हसणार ना मुळीही सारे कळून आले

हे हासणे गुलाबी, आता पुरेच झाले
हसणार ना मुळीही सारे कळून आले
हे हासणे गुलाबी...

संपून ओढ गेली हळुवार भेटण्याची
संपून ओढ गेली हळुवार भेटण्याची
छेडू कशास सूर

छेडू कशास सूर, गाणे विरून गेले
हे हासणे गुलाबी, आता पुरेच झाले
हे हासणे गुलाबी...

खोटाच रंग गाली फसवेच शब्द ओठी
खोटाच रंग गाली फसवेच शब्द ओठी
डोहात भावनेच्या

डोहात भावनेच्या, पाणी जिरून गेले
हे हासणे गुलाबी, आता पुरेच झाले
हे हासणे गुलाबी...

उधळु नकोस गंध मोहातल्या फुलांचा
उधळु नकोस गंध मोहातल्या फुलांचा
गंधात रंगणारे
गंधात रंगणारे, पक्षी उडून गेले

हे हासणे गुलाबी, आता पुरेच झाले
हसणार ना मुळीही सारे कळून आले
हे हासणे गुलाबी, आता पुरेच झाले
हे हासणे गुलाबी...



Credits
Writer(s): Anil Mohile
Lyrics powered by www.musixmatch.com

Link