Sakhya Tula Bhetnyas

सख्या तुला भेटण्यास मी या भल्या पहाटे निघून आले
घरातून चोरपावलांनी लपून आले, जपून आले

विचारले मी न अंबराला, विचारले मी न वारियाला
तुझ्या मिठीचा निरोप आला, मिठीत मी मोहरून आले

तुझ्याच स्वप्नात रात गेली, तुझ्याच स्वप्नात जाग आली
तुझ्याच स्वप्नात जागणाऱ्या जगातूनी मी उठून आले



Credits
Writer(s): Milind Joshi
Lyrics powered by www.musixmatch.com

Link