Mukhi Tujhe Naam

मुखी तुझे नाम
हाचि धर्म नेम
घडो जन्म जन्म
राधावरा

चित्ती तुझे ध्यान
घडो रात्रंदिन
हेचि समाधान
देई आता

सावळे सुंदर
रूप मनोहर
राहो निरंतर
दृष्टीपुढे

दासांचा हा लळा
पुरवी गोपाळा
उशीर दयाळा
नको आता



Credits
Writer(s): Ashok Govind Patki
Lyrics powered by www.musixmatch.com

Link