Ghungarachya Taalavar

घुंगराच्या तालामंदी पैंजण किनकीन वाजलं
भेगाळल्या भुईनं या हिरवसं पानंच दावलं

हे माळरानी ती यकली बांधावर बाभळ
नभाळ्याला ठाव पुसते पावसाचा येरंवळ
सये पानोपानी येता मन वढाया भिजलं

घुंगराच्या तालामंदी पैंजण किनकीन वाजलं
भेगाळल्या भुईनं या हिरवसं पानंच दावलं

फेर धरता अभरनाची रंग भिंगरी पाखरं
नभाय टाळून फिरती रंगला हा जीव रं
पाखरू उडू दे, आभाळ भरू दे
घेऊ दे गिरकी भरदार
पाखरू उडू दे, आभाळ भरू दे
घेऊ दे गिरकी भरदार
बाभळीच्या कोट्यामंदी उतरू दे अल्वर
बाभळीच्या कोट्यामंदी उतरू दे अल्वर
माळरानी ती यकली बांधावर बाभळ
नभाळ्याला ठाव पुसते पावसाचा येरंवळ
सये पानोपानी येता मन वढाया भिजलं

घुंगराच्या तालामंदी पैंजण किनकीन वाजलं
भेगाळल्या भुईनं या हिरवसं पानंच दावलं



Credits
Writer(s): Chaitanya Adkar, Abhay Inamdar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link