Aasamanti Nahi Dhundi

आसमंती नाही धुंदी तरी मज तू धुंद केले
काय जादू ने अशा मज तू सखी, नजरबंद केले
आसमंती नाही धुंदी तरी मज तू धुंद केले
काय जादू ने अशा मज तू सखी, नजरबंद केले

सरे ना धुंदी अजुनी त्या नशेतच मी खेळतो
ना उतरला रंग त्या रंगात अजुनी रंगतो
सरे ना धुंदी अजुनी त्या नशेतच मी खेळतो
ना उतरला रंग त्या रंगात अजुनी रंगतो

काळजाच्या दर्पनी हे चित्र एक चितारलेले
काय जादू ने अशा मज तू सखी, नजरबंद केले

पडली खळी गाली तुझ्या ते आठवे मज या क्षणी
चेहऱ्यावर पसरला तो रतीमा उतरे मनी
पडली खळी गाली तुझ्या ते आठवे मज या क्षणी
चेहऱ्यावर पसरला तो रतीमा उतरे मनी

रूप हे तुजलाच सखये, कुणी सांग बहाल केले?
काय जादू ने अशा मज तू सखी, नजरबंद केले

यौवनाचा दरवळे हा गंध-गंध, दिशा-दिशा
तूच शांत निशानी तुझी उजळती मंगल उषा
यौवनाचा दरवळे हा गंध-गंध, दिशा-दिशा
तूच शांत निशानी तुझी उजळती मंगल उषा

पाहुनी तंव रूप भासे तेज ही झाकुळलेले
काय जादू ने अशा मज तू सखी, नजरबंद केले



Credits
Writer(s): Narendra Bhide, Rajan Lakhe
Lyrics powered by www.musixmatch.com

Link