Hello Kashi Ahes Tu

हजारो माणसे अनोळखी चेहऱ्यांची इथे, वेडा मी शोधतो दिसशील का मला तू कुठे
तुझ्याविना हे सारे वैराण रिते रिते, तुझ्याविना हे जिणे आता नकोसे वाटे
Just One Thought I Have On My Mind
Hello... कशी आहेस तू
अल्लड वारा जशी रुणझुणती धुन जशी
Hello... कशी आहेस तू
कशी आहेस तू
सळसळत्या रानातल्या फूलाचा गंध जशी
Hello... कशी आहेस तू
चहूकडे तुझ्या आठवांचे कवडसे, क्षण इथे आपण जगलो ते वेडे पिसे
तुझ्या रंगात साऱ्या रंगून गेलो होतो, मिठीत रेशमाच्या गुंतून गेलो होतो
You Have Been Always On My Mind
Hello... कशी आहेस तू
अल्लड वारा जशी रुणझुणती धुन जशी
Hello... कशी आहेस तू
आता ना वाटे जगावेसे मला, कुठे वाळवंटात शोधू मी तुला
आता न सोसे दुरावा हा तुझा, नसे अर्थ जगण्यास वाटे ही सजा
इंद्रधनुष्यापरि विरून गेलीस तू, मोकळे आभाळ हे हातात सोडूनी तू
You Have Been Always On My Mind
Hello... कशी आहेस तू
अल्लड वारा जशी रुणझुणती धुन जशी
Hello... कशी आहेस तू
कशी आहेस तू
सळसळत्या रानातल्या फूलाचा गंध जशी
Hello... कशी आहेस तू
Hello... कशी आहेस तू
कशी आहेस तू



Credits
Writer(s): Shrirang Godbole, Vishwajeet Madhav Joshi, Avinash Shripad Chandrachud
Lyrics powered by www.musixmatch.com

Link