Bhui Bhijali

भुई भिजली भिजली
भुई भिजली भिजली

रुजला अंकुर उदरी पोर तृप्तिने माखली

ओंजळ सुखाने भरली
घमघमला ग सुगंध जाई फुलली फुलली

हिरव्या हिरव्या रानात कळी निजे गं पानात
जन्म फुलाचा होईल गं दरवळ जाईल विश्वात
राधेची की कृष्णाची गं बाई
होणार तू कोणाची गं आई
झाला बाई ऋतु सावळा
हा हळू हळू झुलवा गं हिंदोळा
हा हळू हळू झुलवा गं हिंदोळा

जन्म अस्तुरीचा लाभला
जन्म अस्तुरीचा लाभला
कस्तुरीचा सुहास बाई चहु दिशात पांगला
कंथ तिचा गं गुणाचा
शोभतो साजिरा गं सुंदर जोडा ऱाघुमैनेचा
वंश वाढेल वाढेल दुडूदुडू धावेल घर त्याचे गोकुळ होईल
चक्र ऋतुचे फिरते गं वसंत हिरवा येतो गं
शिशिराची चाहूल कधी कधी पानगळ होते गं

सृष्टीचा हा खेळ बाई न्यारा
भुलवितो अवघ्या संसारा
आला बाई ऋतु सावळा
हा हळू हळू झुलवा गं हिंदोळा
हा हळू हळू झुलवा गं हिंदोळा

स्वप्नी पुनवेचा चांदवा
स्वप्नी पुनवेचा चांदवा
बाळ मुठीतून भरला खडीसाखरेचा गोडवा

बाळ मुठीतून भरला खडीसाखरेचा गोडवा
माझी मालन लाडाची मथनीने घुसळिते नि करिते संसार लोण्याचा
हळदी कुंकुवाची कोयरी सौभाग्याचे दान लेऊनी उजळविते घरदारा
भावबंध हे गहिरे गं गोफ तयांचा विनला गं
मधुर केशरी प्रेमाचा पारिजात हा फुलला गं
लक्ष्मीनारायणाची गं जोडी
पंचामृताची गं तिला गोडी
सुखाच्या या लागल्या कळा
हा हळू हळू झुलवा गं हिंदोळा
हा हळू हळू झुलवा गं हिंदोळा



Credits
Writer(s): Vishwajeet Madhav Joshi, Avinash Shripad Chandrachud
Lyrics powered by www.musixmatch.com

Link