Keshi Tujhiya

केशी तुझिया...
केशी तुझिया फुले उगवतील
हो, तुला कशाला वेणी?
केशी तुझिया फुले उगवतील
Hmm, तुला कशाला वेणी?

चांदण्यास शिंगार कशाला?
चांदण्यास शिंगार कशाला?
बसशील तेथे लेणी
तुला कशाला वेणी?

काळोखातही नीळ फुलवशील
चमेलीत वनवाटा
तळमळणाऱ्या पुळणीवर अन
फेनमोगरी लाटा

पहाट अशी तू अमळ निरागस
संध्येपरी साधी-भोळी
जुन्याच ओळी गुणगुणतांना
जमतील सोनपिसोळी

तुला कशाला वेणी?
बसशील तेथे लेणी
तुला कशाला वेणी?

तुझी पावले, पावले, पावले
भिडता येईल तिर्थकळा पाण्याला
स्वरांच्या, तुझ्या स्वरांच्या स्पर्शे येईल
अर्थ नवा गाण्याला

वाळूतीलही तृणपात्याशी
तुझे कोवळे नाते
तुझ्या दिठीने क्षितिजीचेही
अभ्र वितळुनी जाते

तुला कशाला वेणी?

अशा तुला का हवे प्रसाधन?
तूच तुझे गं लेणे
अशा तुला का हवे प्रसाधन?
तूच तुझे गं लेणे

तुला पाहिल्यामुळे आमुचे
कृतार्थ इथले येणे
कृतार्थ इथले येणे

तूच तुझे गं लेणे
केशी तुझिया फुले उगवतील
तुला कशाला वेणी?

चांदण्यास शिंगार कशाला?
चांदण्यास शिंगार कशाला?
बसशील तेथे लेणी
तुला कशाला वेणी?



Credits
Writer(s): Shridhar Phadke, B B Borker
Lyrics powered by www.musixmatch.com

Link