Nana Parimal Durva

नाना परिमळ दुर्वा शेंदूर शमिपत्रे
लाडू, मोदक, अन्ने परिपूरित पात्रे
ऐसे पूजन केल्या बीजाक्षरमंत्रे
अष्टहि सिद्धी, नवनिधी देसी क्षणमात्रे

जय देव, जय देव...
जय देव, जय देव, जय मंगलमूर्ती
तुझे गुण वर्णाया मज कैची स्फूर्ती
जय देव, जय देव...

तुझे ध्यान निरंतर जे कोणी करिती
त्यांची सकलही पापे, विघ्नें ही हरती
वाजी वारण शिबिका सेवक सुत युवती
सर्व ही पावुनी अंती भवसागर तरती

जय देव, जय देव...
जय देव, जय देव, जय मंगलमूर्ती
तुझे गुण वर्णाया मज कैची स्फूर्ती
जय देव, जय देव...

शरणांगत सर्वस्वे भजती तव चरणी
कीर्ती तयांची राहे जोवर शशितरणी
त्रैलोकी ते विजयी अदभूत हे करणी
गोसावीनंदन रत नामस्मरणी

जय देव, जय देव...
जय देव, जय देव, जय मंगलमूर्ती
तुझे गुण वर्णाया मज कैची स्फूर्ती
जय देव, जय देव...



Credits
Writer(s): Nitin Morajkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link