Jay Jay Din Dayala (Aarti Satyanaraynachi)

जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा ॥
पंचारति ओवाळूं श्रीपति तुज भक्तिभावा ॥ ध्रु० ॥

विधियुक्त पूजुनी करिती पुराण श्रवण ॥
परिमलद्रव्यांसहित पुष्पमाळा अर्पून ॥
घृतयुक्तशर्करामिश्रित गोधूमचूर्ण ॥
प्रसाद भक्षण करितां तूं त्यां प्रसन्न नारायण ॥ जय० ॥ १॥

शतानंदे विप्रें पूर्वी व्रत हें आचरिलें ॥
दरिद्र दवडुनि अंतीं त्यातें मोक्षपदा नेलें ॥
त्यापासुनि हें व्रत या कलियुगीं सकळां श्रुत झालें ॥
भावार्थें पूजितां सर्वां इच्छित लाधलें ॥ जय० ॥ २ ॥

साधुवैश्यें संततिसाठीं तुजला प्रार्थियलें ॥इच्छित पुरतां मदांध होऊनि
व्रत न आचरिलें ॥त्या पापानें संकटिं पडुनी दुःखहि भोगीलें
॥स्मृति होउनि आचरितां व्रत त्या तुवांचि उद्ध्रिलें ॥ जय०॥ ३ ॥

प्रसाद विसरुनि पतिभेटीला कलावती गेली ॥
क्षोभ तुझा होतांचि तयाची नौका बुडाली ॥
अंगध्वजरायासी यापरि दुःखस्थिति आली ॥
मृतवार्ता शतपुत्रांची सत्वर कर्णीं परिसीली ॥ जय० ॥४ ॥

पुनरपि पूजुनि प्रसाद ग्रहण करितां तत्क्षणीं ॥
पतिची नौका तरली देखे कलावती नयनीं ॥
अंगध्वजरायासी पुत्र भेटति येऊनि ॥
ऐसा भक्तां संकटिं पावसी तूं चक्रपाणी ॥ जय० ॥ ५ ॥

अनन्यभावें पूजुनि हें व्रत जेजन आचरती ॥
इच्छित पुरविसि त्यांतें देउनि संतति संपत्ति ॥
संहरसी भवदुरितें सर्वहि बंधने तुटती ॥
राजा रंका समान मानुनि पावसि श्रीपती ॥ जय० ॥ ६ ॥

ऐसा तव व्रतमहिमा अपार वर्णूं मी कैसा ।भक्तिपुरःसर आचरती त्यां पावसि
जगदीशा ।भक्तांचा कनवाळू कल्पद्रुम तूं सर्वेशा
॥मोरेश्वरसुत वासुदेव तुज विनवी भवनाशा ॥ जय जय० ॥ ७ ॥



Credits
Writer(s): Nitin Morajkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link