Ujloon Aalong Aabhath (From "Irsha")

उजळून आलं आभाळ रामाच्या पारी
उजळून आलं आभाळ रामाच्या पारी
अन गाव जागवीत आली वासुदेवाची स्वारी
गाव जागवीत आली वासुदेवाची स्वारी

सुर्व्यासंग इर्सा करतोय अंधार गां, अंधार
उजेड त्येला गिळतो म्हणूनी बेजार गां, बेजार

पापाच्या म्होरं पुण्याई ठरतिया भारी
गाव जागवीत आली वासुदेवाची स्वारी
गाव जागवीत आली वासुदेवाची स्वारी

कोंबडा बोलतो गं, कोंबडा बोलतो गं
उगवतीच्या डोईवरी तुरा सूर्याचा डोलतो गं
नारायणाचं रूप खेळवी धरतीला गां, धरतीला
अन इरसरीनं चांद चमकवी रातीला गां, रातीला

ही जिद्द कल्याणापायी असावी सारी
अन गाव जागवीत आली वासुदेवाची स्वारी
गाव जागवीत आली वासुदेवाची स्वारी

(पाय उचला गं सयानो, जाऊ पाण्याला बायानो)
(पाय उचला गं सयानो, जाऊ पाण्याला बायानो)
(किस्न वाजवी पावा गं, बावरल्या नारी)
(किस्न वाजवी पावा गं, बावरल्या नारी)

तुमच्या आधी पाखरं उठली घरट्यात गां, घरट्यात
गाय, वासरू, बैल जागली गोठ्यात गां, गोठ्यात

किस्नाचं रूप हे आलं चालून दारी
अन गाव जागवीत आली वासुदेवाची स्वारी
गाव जागवीत आली वासुदेवाची स्वारी

नंदीराजाच्या जोडीनं मळा शिपला-शिपला
डोळा दिपला-दिपला, आज आकरित घडं
माझ्या खंड्याला वड रे, hey, माझ्या बंड्याला वड रे

भगवंतांना दान दिलं हे गावाला गां, देवाला
मूठपसा हे दान पावलं देवाला गां, देवाला

किरपेला भक्तीची जोड अशी ही न्यारी
अन गाव जागवीत आली वासुदेवाची स्वारी
गाव जागवीत आली वासुदेवाची स्वारी

(आरती करू महादेवाची, जीवाला लागली ओढ शिवाची)
(आरती करू महादेवाची, जीवाला लागली ओढ शिवाची)
(रघुनाथा बैलशीली वाहिला, चरणी अर्पिले पांढऱ्या फुला)
(मिटूनी डोळे लाविले ध्यान, पूजा ही घातली सेवाभावाची)

(आरती करू महादेवाची, जीवाला लागली ओढ शिवाची)
(आरती करू महादेवाची, जीवाला लागली ओढ शिवाची)
(शंभू, शंभू, शंभू)

गाव जागवीत आली वासुदेवाची स्वारी
गाव जागवीत आली वासुदेवाची स्वारी



Credits
Writer(s): Ram Kadam, Jagadish Khabandkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link