Jogawa Jogawa (From "Puri Jara Japun")

जोगवा-जोगवा, अक्कुली जोगवा
(जोगवा-जोगवा, अक्कुली जोगवा)
अन जोगवा-जोगवा बाई, अक्कुली जोगवा
(जोगवा-जोगवा बाई, अक्कुली जोगवा)

माझ्या आईची किरत लय-लय मोठी
(अहो, किरत लय-लय मोठी)
साऱ्या दुनियेची माया भरलिया पोटी
(अहो, माया भरलिया पोटी)

अहो, काळजामंदी तिच्या भक्तीला जागवा
(जोगवा-जोगवा बाई, अक्कुली जोगवा)
(जोगवा-जोगवा बाई, अक्कुली जोगवा)

निळ्या आभाळी...
निळ्या आभाळी झेप घेऊनी
पिसाट झाली पाखरं
रानपाखरं माळानं फिरती
सुसाट गाई-वासरं

वासराच्या कानी भरला बासरीचा गोडवा
(जोगवा-जोगवा बाई, अक्कुली जोगवा)
(जोगवा-जोगवा बाई, अक्कुली जोगवा)

निर्मळ गंगेचं, पाणी गं निर्मळ
(निर्मळ गंगेचं, पाणी गं निर्मळ)
उगवतीनं उधळली गं किरणांची ओंजळ
(उगवतीनं उधळली गं किरणांची ओंजळ)

अहो, पुण्याईच्या माठामंदी गर्दीपण साठवा
(जोगवा-जोगवा बाई, अक्कुली जोगवा)
(जोगवा-जोगवा बाई, अक्कुली जोगवा)

शेतकरी गड्या चल ऱ्हाऊ नको मागं
(शेतकरी गड्या चल ऱ्हाऊ नको मागं)
ललकारी मार आता गाव झालं जागं, हा
(ललकारी मार आता गाव झालं जागं)

ललकारी मार आता गाव झालं जागं
माझ्या ढवळ्या रं, पवळ्या
माझ्या ढवळ्या रं, पवळ्या
Hey, राजा, हे-हे-हे-हे

अन तालावरती ढवळ्या-पवळ्याला नाचवा
(जोगवा-जोगवा बाई, अक्कुली जोगवा)
जोगवा-जोगवा बाई, अक्कुली जोगवा
(जोगवा-जोगवा बाई, अक्कुली जोगवा)



Credits
Writer(s): Jagdish Khebudkar, Viswanath More
Lyrics powered by www.musixmatch.com

Link