Kunjabani Baje

कुंजवणी वाजे ही धुंद बासरी
गवळणींनो आला गं, ओ
गवळणींनो आला गं
आला हरी, आला हरी
कुंजवणी वाजे ही...

यमुनेच्या पाण्याला, पूर येई गाण्याला
यमुनेच्या पाण्याला, पूर येई गाण्याला
पैंजनात जीव गुंतला गं
पैंजनात जीव गुंतला गं

रास अशी रंगुणिया गेली पुरी
गवळणींनो आला गं
आला हरी, आला हरी
कुंजवणी वाजे ही...

पाय पडे तालात, हो, तालात, ताल जमे बोलात
बोल घुमे गाण्यातुनी, हो
पाय पडे तालात, ताल जमे बोलात
बोल घुमे गाण्यातुनी, हो

श्याम असा गोपिका गुंगवी स्वरी
गवळणींनो आला गं
आला हरी, आला हरी
कुंजवणी वाजे ही...

टिपऱ्यांच्या नादाला आसमंत भूललेला
टिपऱ्यांच्या नादाला आसमंत भूललेला
नर्तनात कृष्ण रंगला, हो
नर्तनात कृष्ण रंगला, हो

गोपसखा विश्व असा वेडे करी
गवळणींनो आला गं
आला हरी, आला हरी

कुंजवणी वाजे ही धुंद बासरी
गवळणींनो आला गं
आला हरी, आला हरी



Credits
Writer(s): Shantaram Nadgaonkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link