Chal Unch Unch Jau

चल उंच-उंच जाऊ
चल उंच-उंच जाऊ, चंद्रास हात लाऊ
चल उंच-उंच जाऊ, चंद्रास हात लाऊ

आहेत पावलांशी पथलीप तारकांचे
नक्षत्रमग्न वाटा आणि धुके तमाचे
आहेत पावलांशी पथलीप तारकांचे
नक्षत्रमग्न वाटा आणि धुके तमाचे

ओठात चांदण्यांचे तेजाळ गीत ठेऊ
चल उंच-उंच जाऊ, चंद्रास हात लाऊ
चल उंच-उंच जाऊ, चंद्रास हात लाऊ

केव्हा कसे निघलो? आलो इथे नी कैसे?
क्षण एक-एक जुळुनी झाली प्रकाशवर्षे
केव्हा कसे निघलो? आलो इथे नी कैसे?
क्षण एक-एक जुळुनी झाली प्रकाशवर्षे

अस्वस्थ त्या क्षणांच्या हातात चंद्र देऊ
चल उंच-उंच जाऊ, चंद्रास हात लाऊ
चल उंच-उंच जाऊ, चंद्रास हात लाऊ

अस्तित्व अन लयाचा झुलला झुला जिथून
दिसतात त्या धरेच्या साऱ्या कला इथून
अस्तित्व अन लयाचा झुलला झुला जिथून
दिसतात त्या धरेच्या साऱ्या कला इथून

चल आपुलेच असणे आता दुरून पाहू
चल उंच-उंच जाऊ, चंद्रास हात लाऊ
चल उंच-उंच जाऊ, चंद्रास हात लाऊ
चल उंच-उंच जाऊ, चंद्रास हात लाऊ



Credits
Writer(s): Dr. Salil Kulkarni, Salil Kulkarni, Sudhir Moghe
Lyrics powered by www.musixmatch.com

Link