Aasavano Maziya

आसवांनो माझीया डोळ्यातूनी वाहू नका
आसवांनो माझीया डोळ्यातूनी वाहू नका
अंतरीच्या वेदना...
अंतरीच्या वेदना साऱ्या जगा दावू नका
आसवांनो माझीया डोळ्यातूनी वाहू नका

घाव हे माझे गुलाबी मोहराया लागले
घाव हे माझे गुलाबी मोहराया लागले
कोण मी आहे मला...
कोण मी आहे मला आता तरी सांगू नका
आसवांनो माझीया डोळ्यातूनी वाहू नका

हासते आयुष्य माझे...
हासते आयुष्य माझे पाहुनी माझी व्यथा
हासते आयुष्य माझे पाहुनी माझी व्यथा
का तुम्ही ही हासता? का तुम्ही ही हासता?
हासू नका, हासू नका
आसवांनो माझीया डोळ्यातूनी वाहू नका

स्वप्न माझे भंगले अन गीत माझे संपले
स्वप्न माझे भंगले अन गीत माझे संपले
हाय बाजारात माझा...
हाय बाजारात माझा हुंदका आणू नका

आसवांनो माझीया डोळ्यातूनी वाहू नका
अंतरीच्या वेदना साऱ्या जगा दावू नका
आसवांनो माझीया डोळ्यातूनी वाहू नका



Credits
Writer(s): Dr. Sanjeev Shende
Lyrics powered by www.musixmatch.com

Link