Kitik Disani Sakya

कितीक दिसांनी सखया, सजली सुंदर रात
सखया, सजली सुंदर रात
चंद्र केशरी, मुग्ध चांदणे, शीतल गंधितवात
सखया, सजली सुंदर रात
सखया, सजली सुंदर रात

गाढ मिठी ही, तप्त श्वास हे
अमृत अधरांच्या कलशात
गाढ मिठी ही, तप्त श्वास हे
अमृत अधरांच्या कलशात

रजनी गंधा फुलुन यावी...
रजनी गंधा फुलुन यावी चंदेरी किरणात
सखया, सजली सुंदर रात
सखया, सजली सुंदर रात

गोड शिरशिरी अंगावर ह्या
सूर वाहे गात्रातून ह्या
(गात्रातून ह्या, गात्रातून ह्या)
गोड शिरशिरी अंगावर ह्या
सूर वाहे गात्रातून ह्या

प्रणय धुंद या स्वरधारांनी...
प्रणय धुंद या स्वरधारांनी चिंब भिजू दे रात
सखया, सजली सुंदर रात
सखया, सजली सुंदर रात

अबोल तू ही, अबोल मी ही
स्पर्श सांगे सर्व काही
अबोल तू ही, अबोल मी ही
स्पर्श सांगे सर्व काही

कधी न भिजावी रात अमोली...
कधी न भिजावी रात अमोली, शांत पहाट दवात
सखया, सजली सुंदर रात
सखया, सजली सुंदर रात

कितीक दिसांनी सखया, सजली सुंदर रात
सखया, सजली सुंदर रात
सखया, सजली सुंदर रात



Credits
Writer(s): Dr. Sanjeev Shende
Lyrics powered by www.musixmatch.com

Link