Hrudayamadhle Gaane

म ग पा म ग पा
प म ग म प नि
सा नि प म ग ग

हृदयामधले गाणे माझे
कधीचं नव्हते असे अनावर
हृदयामधले गाणे माझे
कधीचं नव्हते असे अनावर

इतुकी नाजुक रिमझिम नव्हती
या आधी या स्वरा-स्वरावर
हृदयामधले गाणे माझे
कधीचं नव्हते असे अनावर

करून सारी बंद कवाडे
मी माझ्यातचं रमले होते

करून सारी बंद कवाडे
मी माझ्यातचं रमले होते
वाटत होते कळले अवघे
परंतु काही कळले नव्हते

मना आतले आतुर काही
आज अचानक ये ओठांवर
हृदयामधले गाणे माझे
कधीचं नव्हते असे अनावर

न कळे केव्हा, कसे उमटले?
चंद्रखुणांचे ठसे साजीरे

न कळे केव्हा, कसे उमटले?
चंद्रखुणांचे ठसे साजीरे
आता-आता हसण्यावरती
रंग पसरती जरा लाजरे

पडे अनामिक फुल मनावर
जसे चांदणे ये देहावर
हृदयामधले गाणे माझे
कधीचं नव्हते असे अनावर

इतुकी नाजुक रिमझिम नव्हती
या आधी या स्वरा-स्वरावर
हृदयामधले गाणे माझे
कधीचं नव्हते असे अनावर



Credits
Writer(s): Salil Kulkarni
Lyrics powered by www.musixmatch.com

Link