Dis Dhalala

दिस ढळला, चांद फिरून आला माझ्या राजा, माझ्या राजा

तिन्ही सांजेला होई बावरे मन माझे
घेऊन ये ना ताजे स्वप्नांचे गजरे तू राजा, माझ्या राजा

बहर माझे, प्रहर माझे किती फुलले रे
बहर माझे, प्रहर माझे किती फुलले रे
धाप लागे मला त्याची अशी मोहरले
नेमके या क्षणाला हात तुझा ना माझ्या हाती, माझ्या राजा

तिन्ही सांजेला होई बावरे मन माझे
घेऊन ये ना ताजे स्वप्नांचे गजरे तू राजा, माझ्या राजा

मदिर वारे, अधीर तारे तिमीर दरवळला
मदिर वारे, अधीर तारे तिमीर दरवळला
अश्या वेळी जीव माझा आणखी झुरला
सावर मन माझे वाटे रे विरहाची भीती, माझ्या राजा

तिन्ही सांजेला होई बावरे मन माझे
घेऊन ये ना ताजे स्वप्नांचे गजरे तू राजा, माझ्या राजा
दिस ढळला, चांद फिरून आला माझ्या राजा, माझ्या राजा

करी व्याकूळ तुझी चाहुल कशी ही जादू?
करी व्याकूळ तुझी चाहुल कशी ही जादू?
तुझे येथे भास सारे फक्त नाहीस तू
एकटी झुरे राधा उदास यमुनेच्या काठी, माझ्या राजा

तिन्ही सांजेला होई बावरे मन माझे
घेऊन ये ना ताजे स्वप्नांचे गजरे तू राजा, माझ्या राजा
दिस ढळला, चांद फिरून आला माझ्या राजा, माझ्या राजा

तिन्ही सांजेला होई बावरे मन माझे
घेऊन ये ना ताजे स्वप्नांचे गजरे तू राजा, माझ्या राजा
दिस ढळला, चांद फिरून आला माझ्या राजा, माझ्या राजा

Credits
Writer(s): Chandrashekhar Achut Sanekar, Gupte Avadhoot
Lyrics powered by www.musixmatch.com

Link