Angani Majhya

अंगणी माझ्या मनाच्या मोर नाचू लागले
दाटुनी आभाळ आले, मेघ बरसू लागले
अंगणी माझ्या मनाच्या मोर नाचू लागले
दाटुनी आभाळ आले, मेघ बरसू लागले

अश्या चिंब ओल्या क्षणी, पुकारे तुझी साजणी
अश्या चिंब ओल्या क्षणी, पुकारे तुझी साजणी

अंगणी माझ्या मनाच्या मोर नाचू लागले
दाटुनी आभाळ आले, मेघ बरसू लागले

चांदीची ही थेंब फुले, या माळुनी येती सरी
आणि मातीच्या गंधाने भरती सरसर घागरी
चांदीची ही थेंब फुले, या माळुनी येती सरी
आणि मातीच्या गंधाने भरती सरसर घागरी

धुंद नाचते उन्मनी, पुकारे तुझी साजणी
अश्या चिंब ओल्या क्षणी, पुकारे तुझी साजणी

सा रे म प, रे म प नि
सा सा नि प म रे, नि रे सा

गार वारा, मन भरारा शिरशिरीते ही उठे
हा असा पाऊस आणि मी तुला शोधू कुठे?
गार वारा, मन भरारा शिरशिरीते ही उठे
हा असा पाऊस आणि मी तुला शोधू कुठे?

खोड ही तुझी रे जुनी, पुकारे तुझी साजणी
अश्या चिंब ओल्या क्षणी, पुकारे तुझी साजणी

अंगणी माझ्या मनाच्या मोर नाचू लागले
दाटुनी आभाळ आले, मेघ बरसू लागले

अश्या चिंब ओल्या क्षणी, पुकारे तुझी साजणी
अश्या चिंब ओल्या क्षणी, पुकारे तुझी साजणी
अश्या चिंब ओल्या क्षणी, पुकारे तुझी साजणी
अश्या चिंब ओल्या क्षणी, पुकारे तुझी साजणी



Credits
Writer(s): Chandrashekhar Achut Sanekar, Gupte Avadhoot
Lyrics powered by www.musixmatch.com

Link