Shet He Baharale (From "Balidaan")

शेत हे बहरले, पाचू हे पसरले
शेत हे बहरले, पाचू हे पसरले
त्यावरी हे तुरे रत्नमोती हिरे
अशा राजाची राणी झाली रे
कधी असला मजला दिसला ना खजिना

शेत काटेकुटे, उर माझा फुटे
घास वठी कुठे, जाळ पोटी उठे
मन राजाची राणी झाले
दिस गरिबी घरीबी तरीबी समजं ना

शेत हे बहरले, पाचू हे पसरले
शेत काटेकुटे, उर माझा फुटे

म ध प, म ध प, म ध प
म प म, म प म, म प म
रे नी नी स प

तुझ्या घराच्या कौलारातून
ये सोन्याचे ऊन कोवळे
तुझ्या घराच्या कौलारातून
ये सोन्याचे ऊन कोवळे

प्रेम हे आंधळे, भास होती खुळे
पाणी-पाऊस ही वगळे
वल झाले घराचे डोळे
जरी दिसले असले फसले म्हणशील ना

शेत हे बहरले, पाचू हे पसरले
शेत काटेकुटे, उर माझा फुटे

तुझ्या रेशमी स्पर्शामधुनी
धुंद सुखाचे मोर निळे
तुझ्या रेशमी स्पर्शामधुनी
धुंद सुखाचे मोर निळे

प्रेम हे आंधळे, भास होती खुळे
हात राबून रात्र हे काळे
पहा उघडून तुझे डोळे
जरी दिसले असले फसले म्हणशील ना

शेत हे बहरले, पाचू हे पसरले
त्यावरी हे तुरे रत्नमोती हिरे
अशा राजाची राणी झाली रे
कधी असला मजला दिसला ना खजिना

शेत काटेकुटे, उर माझा फुटे
घास वठी कुठे, जाळ पोटी उठे
मन राजाची राणी झाले
दिस गरिबी घरीबी तरीबी समजं ना

शेत हे बहरले, पाचू हे पसरले
शेत हे बहरले, पाचू हे पसरले



Credits
Writer(s): Anil Mohile, Vivek Apate
Lyrics powered by www.musixmatch.com

Link