Bazaar Aahe Band (From "Palva Palvi")

बाजार आहे बंद, पुरवा ना माझा छंद
बाजार आहे बंद, पुरवा ना माझा छंद
बांबूनी पाडून द्या मला झाडाची पिकली करवंद
बांबूनी पाडून द्या मला झाडाची पिकली करवंद

फुगलिया छाती रुंद, फुरफुरती दोन्ही खांद
फुगलिया छाती रुंद अन फुरफुरती दोन्ही खांद
हळूहळू चाखू दे तुझ्या ओठाचा गुलकंद
हळूहळू चाखू दे तुझ्या ओठाचा गुलकंद

मी लाडाची तुमची रखमा, तुम्ही माझे पांडुरंग
मी लाडाची तुमची रखमा, तुम्ही माझे पांडुरंग
भोळ्या रुपात तुमच्या बाई, मी होऊन गेले दंग
भोळ्या रुपात तुमच्या बाई, मी होऊन गेले दंग

वाहतोय वारं मंद, दोघं बी होऊ धुंद
वाहतोय वारं मंद, दोघं बी होऊ धुंद
अन हळूहळू चाखू दे तुझ्या ओठाचा गुलकंद
Hey, बांबूनी पाडून द्या मला झाडाची पिकली करवंद

मी गोटा, तू गारगोटी करू गम्मत गं एक मोठी
मी गोटा, तू गारगोटी करू गम्मत गं एक मोठी
चल घडवूया दोघासाठी एक चमचा अन एक वाटी
चल घडवूया दोघासाठी एक चमचा अन एक वाटी

फुलला नभात चांद, सोडाना बाजूबंद
फुलला नभात चांद, सोडाना बाजूबंद
बांबूनी पाडून द्या बाई, झाडाची पिकली करवंद
पोरी, हळूहळू चाखू दे तुझ्या ओठाचा गुलकंद

जन्मोजन्मीचं आपलं नातं, तुम्ही माझे प्राणनाथ
जन्मोजन्मीचं आपलं नातं, तुम्ही माझे प्राणनाथ
मदनाच्या बसून घरात ममतेचं फिरवू जातं
मदनाच्या बसून घरात ममतेचं फिरवू जातं

उन्हात दोन्ही गेंद झाल्यात लालबुंद
उन्हात दोन्ही गेंद झाल्यात लालबुंद
अन हळूहळू चाखू दे तुझ्या ओठाचा गुलकंद
Hey, बांबूनी पाडून द्या बाई, झाडाची पिकली करवंद

अगं, हळूहळू चाखू दे तुझ्या ओठाचा गुलकंद
हा, बांबूनी पाडून द्या मला झाडाची पिकली करवंद



Credits
Writer(s): Dada Kondke, Ramlaxman
Lyrics powered by www.musixmatch.com

Link