Majha Sajana (From "Bandhan")

माझ्या सजणा, ओ, साद देना
माझ्या सजणा, साद देना, ओ
घडी-घडी बघता रूप तुझे मी
हृदयी प्रीती जागे, ओ

तुझ्याकडे मन घेत भरारी
ओढ कशी ही लागे, ओढ कशी ही लागे

कशाचे हे बंधन रे? कसे आपले पण रे?
कुणाचे काही ना चाले, कसे हे आकर्षण रे?
माझ्या सजणी, ओ, साद देना
माझ्या सजणी, साद देना, ओ

सजणा, तुझ्या या भेटीमधुनी मजला स्त्रीपण कळले, ओ
तूच दिली मज महानता ही
प्रेमरूप मी झाले, ओ, प्रेमरूप मी झाले
धुंद हे वेडेपण रे, आस ही मुक्या मनाची
प्रीतीला दृष्ट ना लागो तुला रे शपथ गळ्याची

माझ्या सजणा, साद देना
माझ्या सजणा, साद देना, ओ
घडी-घडी बघता रूप तुझे मी
हृदयी प्रीती जागे, ओ

तुझ्याकडे मन घेत भरारी
ओढ कशी ही लागे, ओढ कशी ही लागे
माझ्या सजणी, ओ, साद देना
माझ्या सजणी, साद देना, ओ

बंधना पलीकडे ही तुझी अन माझी दुनिया
भेट ही मना मनांची कशी ही घडते किमया
अंतरी आस अशी ही ऊब श्वासांनी द्यावी
आग आगीला भिडता मने ही वितळून जावी

माझ्या सजणा, साद देना
माझ्या सजणा, साद देना, ओ
घडी-घडी बघता रूप तुझे मी
हृदयी प्रीती जागे, ओ

तुझ्याकडे मन घेत भरारी
ओढ कशी ही लागे, ओढ कशी ही लागे
माझ्या सजणी (माझ्या सजणा)
साद देना (साद देना)

माझ्या सजणी (माझ्या सजणा)
साद देना (साद देना)
माझ्या सजणी (माझ्या सजणा)



Credits
Writer(s): Anil Mohile, Jagdish Khebudkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link