Shanideva Vandan Tuj Karito (From "Shanidevachi Bhajne")

शनिदेवा वंदन तुज करितो
शनिदेवा वंदन तुज करितो
तुझिया नामाचा छंद लागू दे
पायी तीर्थयात्रा घडू दे

तुझिया नामाचा छंद लागू दे
पायी तीर्थयात्रा घडू दे
साधू चरणी मस्तक जडू दे
साधू चरणी मस्तक जडू दे

काकुळती तुज येतो शनिदेवा
शनिदेवा वंदन तुज करितो
शनिदेवा वंदन तुज करितो

गोर-गरिबासी खावयास दे
सुखी-समाधानी तया असू दे
गोर-गरिबासी खावयास दे
सुखी-समाधानी तया असू दे

हाल तयाचे कधी नसू दे
ही विनंती तुज करितो देवा
शनिदेवा वंदन तुज करितो
शनिदेवा वंदन तुज करितो

साधू-संतांचा द्वेष नसावा
देव चरणी देह झिजावा
साधू-संतांचा द्वेष नसावा
देव चरणी देह झिजावा

दया, क्षमा, शांती हृदयात असू द्या
प्रेमभावे तुज नमीतो शनिदेवा
शनिदेवा वंदन तुज करितो
शनिदेवा वंदन तुज करितो

दास उदासी लागे चरणा
वर्णन करितो तुझा महिमा
दास उदासी लागे चरणा
वर्णन करितो तुझा महिमा

एवढी भिक्षा घाली आम्हा
भक्त जणांची येऊ द्या करुणा
एवढी भिक्षा घाली आम्हा
भक्त जणांची येऊ द्या करुणा

पदर तुज पसरवितो देवा
वंदन तुज करितो शनिदेवा
शनिदेवा वंदन तुज करितो
तुझिया नामाचा छंद लागू दे
पायी तीर्थयात्रा घडू दे

तुझिया नामाचा छंद लागू दे
पायी तीर्थयात्रा घडू दे
साधू चरणी मस्तक जडू दे
साधू चरणी मस्तक जडू दे

काकुळती तुज येतो शनिदेवा
वंदन तुज करितो शनिदेवा
शनिदेवा वंदन तुज करितो



Credits
Writer(s): Nandu Honap, Shri B.g.andhare
Lyrics powered by www.musixmatch.com

Link