Shani Devachi Aarti (From "Shanidevachi Bhajne")

जय-जय श्री शनिदेवा, पद्मकर शिरी ठेवा
आरती ओवाळीतो मनोभावे करुनी सेवा
जय-जय श्री शनिदेवा

सुर्यसुता शनिमूर्ती तुझी अगाध कीर्ति
एकमुखे काय वर्णू शेषा ना चले स्फुर्ती
जय-जय श्री शनिदेवा

नवग्रहांमाजी श्रेष्ठ पराक्रम थोर तुझा
ज्यावरी कृपा करिसी होय रंकाचा राजा
जय-जय श्री शनिदेवा

विक्रमासारखा हो शककरता पुण्यराशी
गर्व धरिता शिक्षा केली, बहुत छळीयेले त्यासी
जय-जय श्री शनिदेवा

शंकराच्या वरदाने गर्व रावणाने केला
साडेसाती येता त्यासी समूळ नाशासी नेला
जय-जय श्री शनिदेवा

प्रत्यक्ष गुरुनाथा चमत्कार दावियेला
नेऊनि सुळापाशी पुन्हा सन्मान केला
जय-जय श्री शनिदेवा

ऐसे गुण किती गाऊ घणी ना पुरे गाता
कृपा करि दीनांवरी महाराजा समर्था
जय-जय श्री शनिदेवा

दोन्ही कर जोडनियां रक्मालीन सदा दाई
प्रसाद हाची मागे उदय काळ सौख्यदावी
जय-जय श्री शनिदेवा

जय-जय श्री शनिदेवा, पद्मकर शिरी ठेवा
आरती ओवाळीतो मनोभावे करुनी सेवा
जय-जय श्री शनिदेवा

जय-जय श्री शनिदेवा
जय-जय श्री शनिदेवा



Credits
Writer(s): Nandu Honap, Traditional
Lyrics powered by www.musixmatch.com

Link