Jhala Anand Khara

गणपती बाप्पा मोरया, अरे, मंगलमूर्ती मोरया
ए, गणपती बाप्पा मोरया, अरे, मंगलमूर्ती मोरया

झाला आनंद खरा, गणपती आले घरा
हो, झाला आनंद खरा, गणपती आले घरा
देई आम्हा स्फूर्ती
रे मोरया, जय जय मंगलमूर्ती

(रे मोरया, जय जय मंगलमूर्ती)
(रे मोरया, जय जय मंगलमूर्ती)

झाला आनंद खरा, गणपती आले घरा
देई आम्हा स्फूर्ती
रे मोरया, जय जय मंगलमूर्ती
(रे मोरया, जय जय मंगलमूर्ती)
(रे मोरया, जय जय मंगलमूर्ती)

आला वर्षानं घरी, काय-काय सांगू तरी
जातो दिवस आम्हा एक-एक वर्षापरी
झाली महागाई अति, रोजच वाढे गती
कसं जगावं जीन? येई रे लुंगमती

दे रे आम्हा शक्ती
रे मोरया, जय जय मंगलमूर्ती
(रे मोरया, जय जय मंगलमूर्ती)
(रे मोरया, जय जय मंगलमूर्ती)

सुखकर्ता तू असे, दुखहर्ता तू असे
तारीशी संकटी तू, तुजविण कोणी नसे
साक्षात मूर्ती तुझी किती सुंदर दिसे
कला-गुणांचा पुरा साठा तुझ्यात वसे

अशी तुझी कीर्ती
रे मोरया, जय जय मंगलमूर्ती
(रे मोरया, जय जय मंगलमूर्ती)
(रे मोरया, जय जय मंगलमूर्ती)

बघ-बघ चहूकडे, स्वार्थाची आग झडे
एकीला जाई तडे, प्रेतांचे पडती सडे
देशाची प्रगती अडे, जो-तो चिंतेत गडे
शांती राहावी अशी असा हा प्रश्न पडे

द्यावी तंया संमती
रे मोरया, जय जय मंगलमूर्ती
(रे मोरया, जय जय मंगलमूर्ती)
(रे मोरया, जय जय मंगलमूर्ती)

Hey, गणनायका, सिद्धीविनायका
द्या आशीर्वाद आम्हा पती तो धारका
कृपा या दीनावरी करा-करा हो पुरी
झुकवुनी हा माथा ठेवितो चरणावरी

ओवाळुनी आरती
रे मोरया, जय जय मंगलमूर्ती
(रे मोरया, जय जय मंगलमूर्ती)
(रे मोरया, जय जय मंगलमूर्ती)

झाला आनंद खरा, गणपती आले घरा
हो, झाला आनंद खरा, गणपती आले घरा
देई आम्हा स्फूर्ती
रे मोरया, जय जय मंगलमूर्ती

(रे मोरया, जय जय मंगलमूर्ती)
(रे मोरया, जय जय मंगलमूर्ती)

(रे मोरया, जय जय मंगलमूर्ती)
(रे मोरया, जय जय मंगलमूर्ती)
(रे मोरया, जय जय मंगलमूर्ती)



Credits
Writer(s): Madhurkar Pathak, Ramakant Pathak
Lyrics powered by www.musixmatch.com

Link