Saangata Hi Yet Naahee - From "Jeevan Ek Sangharsh"

सांगता ही येत नाही घाव हा हृदयातुनी
सांगता ही येत नाही घाव हा हृदयातुनी
विस्तवाची रेघ का रे आपल्या नात्यातुनी?
सांगता ही येत नाही घाव हा हृदयातुनी

भास तो चिमण्या सुखाचा, ऊब ती मायेतली
कोण का उमजू शके ना? ओढ ती दोघातली
भास तो चिमण्या सुखाचा, ऊब ती मायेतली
कोण का उमजू शके ना? ओढ ती दोघातली

मी कुठेही पाहता रे तूच दिसशी लोचनी
विस्तवाची रेघ का रे आज या नात्यातुनी?
सांगता ही येत नाही घाव हा हृदयातुनी

ये पिला तू धाव घे रे हात माझे मोकळे
पाय हे माझे तूला घे अश्रू माझे पांगळे
ये पिला तू धाव घे रे हात माझे मोकळे
पाय हे माझे तूला घे अश्रू माझे पांगळे

ठायी-ठायी भास होती कोण तुझिया वाचूनी?
विस्तवाची रेघ का रे आज या नात्यातुनी?
सांगता ही येत नाही घाव हा हृदयातुनी

मी तुला जपले चिमुकल्या अंतरी श्वासापरी
श्वास माझा दूर जाता देह हा प्रेतापरी
मी तुला जपले चिमुकल्या अंतरी श्वासापरी
श्वास माझा दूर जाता देह हा प्रेतापरी

साद ऐकून येई सोन्या प्रार्थना हृदयातुनी
विस्तवाची रेघ का रे आज या नात्यातुनी?
सांगता ही येत नाही घाव हा हृदयातुनी
विस्तवाची रेघ का रे आपल्या नात्यातुनी?
सांगता ही येत नाही घाव हा हृदयातुनी



Credits
Writer(s): Pravin Davne, Ashok Vaigankar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link