Kiti Sawarava

किती सावरावा तोल
डोह मनाचा खोल
काळजाच्या आजारा
सापडंना उतारा
बेईमान चांदवा
भोगतोय अंधारा
किती सावरावा तोल

हो, काही सुचना, काही कळंना
आकरीत घडलं हे सारं
विसरून भान, धावतं मन
कानात भरून वारं

हो, काही सुचना, काही कळंना
आकरीत घडलं हे सारं
विसरून भान, धावतं मन
कानात भरून वारं

याला प्रेम म्हणावं की आग?
भरं जखम उरावा डाग

हो, किती सावरावा तोल
डोह मनाचा खोल, खोल

तुझी आठवण येता
हारवती चोरवाटा
कशी पडली जीवाला रानभूल
डोळा डसलं सपान
उरे अधूरच गाणं
घट्ट नात्यातली वीण झाली सैल

हो, उभा जन्म हा जाळावा
तुझ्या एका सावलीशी
वाट बासरी पाहाते
कधी राहीन ओठांशी

याला प्रेम म्हणावं की आग?
भरं जखम उरावा डाग
याला प्रेम म्हणावं की आग?
भरं जखम उरावा डाग

हो, किती सावरावा तोल
डोह मनाचा खोल, खोल



Credits
Writer(s): Mandar Cholkar, Amitraj
Lyrics powered by www.musixmatch.com

Link