Velhala

किती जन्म हा चालावा लपाछुपीचा चाळा
किती जन्म हा चालावा लपाछुपीचा चाळा
कालिंदीच्या तटावरी, कालिंदीच्या तटावरी
येशील रे वेल्हाळा

किती जन्म हा चालावा लपाछुपीचा चाळा
कालिंदीच्या तटावरी, कालिंदीच्या तटावरी
येशील रे वेल्हाळा

किती जन्म हा चालावा लपाछुपीचा चाळा
लपाछुपीचा चाळा, लपाछुपीचा चाळा

अवघ्या देहाचे गोकुळ केले तुझ्याचसाठी, तुझ्याचसाठी
माझे मी पण वाहून नेले तुझ्याचसाठी, तुझ्याचसाठी

आता ह्या शांततेत वाजे आर्त निरामय पावा
निरोप साधा आणत नाही दूर देशीचा रावा

स्वैर विदेही आत्म्याला, स्वैर विदेही आत्म्याला
शृंगार का १६ सरल्यावरी उरावा लपाछुपीचा चाळा

कालिंदीच्या तटावरी, कालिंदीच्या तटावरी
येशील रे वेल्हाळा

किती जन्म हा चालावा लपाछुपीचा चाळा
लपाछुपीचा चाळा, लपाछुपीचा चाळा

चेहऱ्यावरती हे लाखों चेहरे क्षणाक्षणाला कुणाकुणाचे
हसण्यावर ही का इतुके ओझे क्षणाक्षणाला कुण्या मनाचे?

कोणाच्या चाहुलीत येतो कोणाचा सांगावा
श्वासांचा अन भासांचा हा खेळ कधी थांबावा

लख्ख उजेडी अवती-भवती...
लख्ख उजेडी अवती-भवती फिरती कातरवेळा
कातरवेळा, कातरवेळा



Credits
Writer(s): Vaibhav Joshi, Nilesh Moharir
Lyrics powered by www.musixmatch.com

Link