Velhala (Male Version)

किती जन्म हा चालावा लपा-छुपीचा चाळा?
किती जन्म हा चालावा लपा-छुपीचा चाळा?
कालिंदीच्या तटावरी...
कालिंदीच्या तटावरी येशील रे वेल्हाळा

किती जन्म हा चालावा लपा-छुपीचा चाळा?
कालिंदीच्या तटावरी...
कालिंदीच्या तटावरी येशील रे वेल्हाळा
किती जन्म हा चालावा लपा-छुपीचा चाळा?

...लपा-छुपीचा चाळा
...लपा-छुपीचा चाळा

अवघ्या देहाचे गोकुळ केले
तुझ्याचसाठी, तुझ्याचसाठी
माझे मी पण वाहून नेले
तुझ्याचसाठी, तुझ्याचसाठी

आता ह्या शांततेत वाजे आर्त निरामय पावा
निरोप साधा आणत नाही दूर देशीचा रावा
स्वैर विदेही आत्म्याला...
स्वैर विदेही आत्म्याला शृंगार का सोहळा सरल्यावरी उरावा?

...लपा-छुपीचा चाळा
कालिंदीच्या तटावरी...
कालिंदीच्या तटावरी येशील रे वेल्हाळा
किती जन्म हा चालावा लपा-छुपीचा चाळा

...लपा-छुपीचा चाळा
...लपा-छुपीचा चाळा

चेहऱ्यावरती हे लाखो चेहरे
क्षणा-क्षणाला कुणकुणाचे?
हसण्यावरही का इतुके ओझे?
क्षणा-क्षणाला कुण्या मनाचे?

कोणाच्या चाहूलीत येतो, कोणाचा सांगावा?
श्वासांचा अन भासांचा हा खेळ कधी थांबवा
लख्ख उजेडी अवती-भवती...
लख्ख उजेडी अवती-भवती फिरती का तर वेळा?

...का तर वेळा?
...का तर वेळा?



Credits
Writer(s): Vaibhav Joshi, Nilesh Moharir
Lyrics powered by www.musixmatch.com

Link