Chaati Thoku Hai Sangu Jagala

या देशातील शोषित, पीडित
दलितांचे उद्धारक, दिग्विजय नेते
विश्वरत्न, परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांना कोटी-कोटी प्रणाम

अथांग सागर एकत्र करूनी शाई बनवली जरी
मेरू हिमालय करून लेखणी खुशाल धरू द्या करी
कोटी विभूती कालिदास हे लिहिण्या बसले जरी
कवी रमेशा, पूर्ण भिमायन कधी ना होईल तरी

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांच्या स्मृतीप्रित्यर्थ super cassete industries
सादर करीत आहेत बाबसाहेबांच्या जीवनातील
निवडक महत्वपूर्ण घटनेवर आधारित गीत

गीतकार "प्रभाकर पोखरेकर"
संगीत "निखिल, विनय"
गायक "सोनू निगम, अन्वर जानी"

छाती ठोक हे सांगू जगाला
असा विद्वान होणार नाही

छाती ठोक हे सांगू जगाला
छाती ठोक हे सांगू जगाला
असा विद्वान होणार नाही
छाती ठोक हे सांगू जगाला
असा विद्वान होणार नाही

कोणी झालाच, हो, कोणी झालाच
कोणी झालाच विद्वान मोठा
बुद्ध भगवान होणार नाही
कोणी झालाच विद्वान मोठा
बुद्ध भगवान होणार नाही
छाती ठोक हे सांगू जगाला

दीन-दुबळ्यांची उडवूनी सुस्ती
चातुरवर्णाची जिरवूनी मस्ती
दीन-दुबळ्यांची उडवूनी सुस्ती
चातुरवर्णाची जिरवूनी मस्ती

कधी हरला ना, हो, कधी हरला ना
कधी हरला ना ज्ञानाची कुस्ती
असा पहिलवान होणार नाही
कधी हरला ना ज्ञानाची कुस्ती
असा पहिलवान होणार नाही
छाती ठोक हे सांगू जगाला

ज्याच्या घटनेवर चाले हे राज
ज्ञान, वैभव हे त्यालाच साज
ज्याच्या घटनेवर चाले हे राज
ज्ञान, वैभव हे त्यालाच साज

कुबेराला ही, हो, कुबेराला ही
कुबेराला ही वाटावी लाज
असा धनवान होणार नाही
कुबेराला ही वाटावी लाज
असा धनवान होणार नाही
छाती ठोक हे सांगू जगाला

ओझं पाठीशी हे उपकाराचं
कसं फिटणार त्या युगंधराचं?
ओझं पाठीशी हे उपकाराचं
कसं फिटणार त्या युगंधराचं?

हे रमेशा त्या, हे रमेशा त्या
हे रमेशा त्या प्रभाकराचं
का रे गुणगान होणार नाही?
हे रमेशा त्या प्रभाकराचं
का रे गुणगान होणार नाही?

छाती ठोक हे सांगू जगाला
असा विद्वान होणार नाही
कोणी झालाच विद्वान मोठा
बुद्ध भगवान होणार नाही
छाती ठोक हे सांगू जगाला



Credits
Writer(s): Nikhil-vinay, Prabhakar Pokhrikar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link