He Paani Anile Mi Math Bharuni

एकेदिवशी भरदुपारी पनवेलच्या नाक्यावरून
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची मोटार
भर वेगात चालली होती
बाबासाहेबांना खूप तहान लागली

म्हणून ड्रायव्हरनं जवळच्या hotel समोर गाडी थांबवली
बाबासाहेबांच्या समवेत असलेले
त्यांचे सहकरी, गडकरी पाणी आणायला गेले
Barrister आंबेडकरांना पाणी होय

हॉटेलच्या मालकानं साफ नकार दिला
Hotel मालक उद्गारला
"महार barrister ला पाणी मुळीच मिळणार नाही"

हे शब्द "सोनबा येलवे" नावाच्या
लाकूड तोडणाऱ्या माणसानं ऐकले
धावत-पळत तो घरी गेला
स्वछ पाण्यानं माठ भरून आणला

पण तेवढ्यात बाबासाहेबांची मोटार
भर वेगानं निघून सुद्धा गेली
बाबासाहेब पुन्हा या वाटेनं येतील
ते तसे जाऊ नयेत
म्हणून आयुष्यभर त्या वाटेवर

पाण्याचा माठ भरून
सोनबा वाट पाहत उभा राहिला
तो संपला, शेवटच्या
क्षणापर्यंत तो बोलत होता

हे पाणी आणिले मी...
हे पाणी आणिले मी माठ भरुनी
हे घोटभर जा हो पिऊनी
हे पाणी आणिले मी माठ भरुनी

हे घोटभर जा हो पिऊनी
हे पाणी आणिले मी...

नव्हे मानसं, सारीच सैतान ही
भीमबाबा यांना नाही मुळी जाण ही
नव्हे मानसं, सारीच सैतान ही
भीमबाबा यांना नाही मुळी जाण ही

हे मोठ्या श्रद्धेनी...
हे मोठ्या श्रद्धेनी आलो मी घेऊनी
हे घोटभर जा हो पिऊनी
हे पाणी आणिले मी माठ भरुनी
हे घोटभर जा हो पिऊनी

भर उन्हात व्याकूळ जीव थांबला
शब्द कर्मठांचा जिव्हारी तो झोंबला
भर उन्हात व्याकूळ जीव थांबला
शब्द कर्मठांचा जिव्हारी तो झोंबला

तो दाही दिशा पाही...
तो दाही दिशा पाही टक लावूनी
हे घोटभर जा हो पिऊनी
हे पाणी आणिले मी माठ भरुनी
हे घोटभर जा हो पिऊनी

जीव जीवात हा होता त्याच्या जोवर
पाणी घेऊनी वाट पाहिली तोवर
जीव जीवात हा होता त्याच्या जोवर
पाणी घेऊनी वाट पाहिली तोवर

तो प्राण सोडिला...
तो प्राण सोडिला "बाबा" म्हणूनी
हे घोटभर जा हो पिऊनी
हे पाणी आणिले मी माठ भरुनी
हे घोटभर जा हो पिऊनी

बोले सोनबा, "भीमबाबा येतील
पाणी घोटभर माझ्या हाती घेतील"
बोले सोनबा, "भीमबाबा येतील
पाणी घोटभर माझ्या हाती घेतील"

तो धन्य, प्रभाकरा...
तो धन्य, प्रभाकरा वाट पाहूनी
हे घोटभर जा हो पिऊनी
हे पाणी आणिले मी माठ भरुनी
हे घोटभर जा हो पिऊनी

हे पाणी आणिले मी माठ भरुनी
हे घोटभर जा हो पिऊनी
हे पाणी आणिले मी माठ भरुनी
हे घोटभर जा हो पिऊनी



Credits
Writer(s): Nikhil-vinay, Prabhakar Pokhrikar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link