Bheem Rayane Dalita

या देशातील हीन, दीन, दुबळा समाज
जो सैरा-वैरा भटकत होता, जो दिशाहीन होता
ज्यांना कोणी वालिच नव्हता
अश्या भोळ्या, भाबळ्या, दुबळ्यांना
बाबा साहेबांनी हृदयाशी धरून आपलस केलं
आईची, पित्याची माया दिली

भीमरायाने दलिता सहारा तो दिला, सहारा तो दिला
आई होऊनिया दुबळ्यांना निवारा दिला
भीमरायाने दलिता सहारा तो दिला, सहारा तो दिला
आई होऊनिया दुबळ्यांना निवारा दिला
भीमरायाने दलिता...

जग सारे झोपले, तो नाही झोपला
जग सारे झोपले, तो नाही झोपला
रात्र-दिन जागुनी देशासाठी खपला

जागे करूनी समाजा पहारा तो दिला, पहारा तो दिला
आई होऊनिया दुबळ्यांना निवारा दिला
भीमरायाने दलिता...

शिकवूनी समाजाला तो ही शिकला
शिकवूनी समाजाला तो ही शिकला
स्वार्था पाई कुणा पुढे कधी नाही झुकला

दुःख जाणुनी सुखाचा उबारा तो दिला, उबारा तो दिला
आई होऊनिया दुबळ्यांना निवारा दिला
भीमरायाने दलिता...

उपकार बाबांचे ते नाही फिटणार
उपकार बाबांचे ते नाही फिटणार
प्रभाकरा तैसा कुणी आज नाही झटणार

क्रांती घडवूनी माणसा निखारा तो दिला, निखारा तो दिला
आई होऊनिया दुबळ्यांना निवारा दिला
भीमरायाने दलिता सहारा तो दिला, सहारा तो दिला
आई होऊनिया दुबळ्यांना निवारा दिला



Credits
Writer(s): Nikhil-vinay, Prabhakar Pokhrikar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link