Chal - G - Sakhe Pandhreela

पुंडलीका वरदे (हारी विठ्ठल)
श्री ज्ञानदेव (तुकाराम)

विठ्ठल-विठ्ठल, जय हरि विठ्ठल
(विठ्ठल-विठ्ठल, जय हरि विठ्ठल)

चल गं सखे, चल गं सखे पंढरीला
(जय हरि विठ्ठल)
चल गं सखे, चल गं सखे पंढरीला
(जय हरि विठ्ठल)

तू ध्यानी जरा ठेव...
तू ध्यानी जरा ठेव, जिथे भाव, तिथे देव
चल भेटू विठ्ठल रखुमाईला

चल गं सखे, चल गं सखे पंढरीला
(जय हरि विठ्ठल)
ए, चल गं सखे, चल गं सखे पंढरीला
(जय हरि विठ्ठल)

चंद्रभागा नदीतीरावर (विठ्ठल-विठ्ठल)
मंदिर विठ्ठलाचे सुंदर (विठ्ठल-विठ्ठल)
देव आहे उभा विटेवर (विठ्ठल-विठ्ठल)
ठेऊनी दोन्ही कर कटेवर (विठ्ठल-विठ्ठल)

ते पाहू त्यांचे रूप...
ते पाहू त्यांचे रूप, लाऊ उद आणि धूप
करू वंदन प्रभूच्या मूर्तीला

चल गं सखे, चल गं सखे पंढरीला
(जय हरि विठ्ठल)
ए, चल गं सखे, चल गं सखे पंढरीला
(जय हरि विठ्ठल)

देवाच्या दारी कुणा ना बंदी (विठ्ठल-विठ्ठल)
दुःखी, पीडित होती आनंदी (विठ्ठल-विठ्ठल)
दुर्जन होती भक्तीचे छंदी (विठ्ठल-विठ्ठल)
आली चालून छान ही संधी (विठ्ठल-विठ्ठल)

तू दे हातात हात...
तू दे हातात हात, उद्या चल गं धरू वाट
पाहू डोळे भरूनी जगजेठीला

चल गं सखे, चल गं सखे पंढरीला
(जय हरि विठ्ठल)
ए, चल गं सखे, चल गं सखे पंढरीला
(जय हरि विठ्ठल)

वाली गरिबांचा पंढरपुरात (विठ्ठल-विठ्ठल)
दर्शन घेऊ जोडुनी हात (विठ्ठल-विठ्ठल)
तोच देईल संकटी साथ (विठ्ठल-विठ्ठल)
नांदू संसारी दोघे सुखात (विठ्ठल-विठ्ठल)

तुला सांगतो त्रिवार...
तुला सांगतो त्रिवार, नको देऊ तू नकार
आज दत्तात्रयाच्या वाणीला

चल गं सखे, चल गं सखे पंढरीला
(जय हरि विठ्ठल)
ए, चल गं सखे, चल गं सखे पंढरीला
(जय हरि विठ्ठल)

(विठ्ठल-विठ्ठल, जय हरि विठ्ठल)
(विठ्ठल-विठ्ठल, जय हरि विठ्ठल)
(विठ्ठल-विठ्ठल, जय हरि विठ्ठल)
(विठ्ठल-विठ्ठल, जय हरि विठ्ठल)

(विठ्ठल-विठ्ठल, जय हरि विठ्ठल)
(विठ्ठल-विठ्ठल, जय हरि विठ्ठल)



Credits
Writer(s): Traditional, Bhushan Dua
Lyrics powered by www.musixmatch.com

Link