Darshan De Re Bhagvanta

दर्शन दे रे, दे रे भगवंता
किती अंत आता पाहशी अनंता
दर्शन दे रे, दे रे भगवंता
दर्शन दे रे, दे रे भगवंता

माय पित्याची सेवा कुंडलिकाची
भक्ती पाहिली तू गोऱ्या कुंभाराची
ऐसे येणे होवे तुझे कृपावंता
दर्शन दे रे, दे रे भगवंता
दर्शन दे रे, दे रे भगवंता

ऐकताच वाणी 'संत चोखोबाची'
साक्षात प्रगटे मूर्ती विठ्ठलाची
ऐसे दान देशी, तुझ्या प्रिय संता
दर्शन दे रे, दे रे भगवंता
दर्शन दे रे, दे रे भगवंता

तूच जन्मदेता, तूच विश्वकरता
मन शांत होई तुझे गुण गाता
हीच एक आशा पूर्वी तू आता
दर्शन दे रे, दे रे भगवंता
दर्शन दे रे, दे रे भगवंता



Credits
Writer(s): Madhurkar Pathak, Datta Patil
Lyrics powered by www.musixmatch.com

Link