Mokale Te Kesa Hotey

मोकळे ते केस होते...
मोकळे ते केस होते न्हाऊनी ओलावले
मोकळे ते केस होते न्हाऊनी ओलावले

तापले ते श्वास होते...
तापले ते श्वास होते घेऊनि पचतावले

मोकळे ते केस होते न्हाऊनी ओलावले
तापले ते श्वास होते...
तापले ते श्वास होते घेऊनि पचतावले
मोकळे ते केस होते...

साज, सजले बैसले मी ऐकण्या ती पाऊले
साज, सजले बैसले मी ऐकण्या ती पाऊले
भास झाले अन कितीदा दार ही हे लावले

तास गेले प्रहर सरले, तास गेले प्रहर सरले
ते ही ना मी मोजले
सर्व आले, सर्व गेले, सर्व आले, सर्व गेले
आलास तू की पावले

तापले ते श्वास होते...
तापले ते श्वास होते घेऊनि पचतावले
मोकळे ते केस होते...

काळजाच्या काळजीने काजळा ओलावले
काळजाच्या काळजीने काजळा ओलावले
पोवळ्यांचे रंग विरले, पारवे सुस्तावले

बंध सुटले, हार सुकले, बंध सुटले
बंध सुटले, हार सुकले आज ह्या केसातले
परतूनी ती सांज गेली, परतूनी ती सांज गेली
परतूनी ती सांज गेली, बिंबही अस्तावले

तापले ते श्वास होते...
तापले ते श्वास होते घेऊनि पचतावले
मोकळे ते केस होते...



Credits
Writer(s): Ashish Mujumdar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link