Paakharachya Samori

पाखराच्या सामोरी मांडुनी आभाळ

पाखराच्या सामोरी मांडुनी आभाळ
पाखराच्या सामोरी मांडुनी आभाळ
छाटलेस पंख, पांडुरंगा
छाटलेस पंख, पांडुरंगा

तुटलं घरटं, माजलं वारूळ
तुटलं घरटं, माजलं वारूळ
का दिलास डंख, पांडुरंगा?
का दिलास डंख, पांडुरंगा?
पाखराच्या सामोरी मांडुनी आभाळ

भरलेल्या डोळ्यांनी या पाहिलं सपान रे
वाहून घेऊन गेला आलेलं तुफान रे, पांडुरंगा
भरलेल्या डोळ्यांनी या पाहिलं सपान रे
वाहून घेऊन गेला आलेलं तुफान रे

मायबाप, लेकराची केली ताटातूट
मायबाप, लेकराची केली ताटातूट
पांघरलं दुःख, पांडुरंगा
पांघरलं दुःख, पांडुरंगा
पाखराच्या सामोरी मांडुनी आभाळ

मनातल्या रानामध्ये वनवा हा पेटला
वाऱ्यावर पाचोळ्याचा आधार हा सुटला
पांडुरंगा, ओ पांडुरंगा
मनातल्या रानामध्ये वनवा हा पेटला
वाऱ्यावर पाचोळ्याचा आधार हा सुटला

निखारा डोळ्यात आणि श्वासांच्या या ठिणग्या
निखारा डोळ्यात आणि श्वासांच्या या ठिणग्या
काळजात राख, पांडुरंगा
काळजात राख, पांडुरंगा
पाखराच्या सामोरी मांडुनी आभाळ

सारी तुझी लेकरं तरी भेदभाव का?
जात माणसाची वेग-वेगळं हे नाव का?
रे पांडुरंगा, रे पांडुरंगा, पांडुरंगा
सारी तुझी लेकरं तरी भेदभाव का?
जात माणसाची वेग-वेगळं हे नाव का?

भीक नाही मागत हे भूकलेलं पाखरू
भीक नाही मागत हे भूकलेलं पाखरू
काय झाली चूक, पांडुरंगा?
काय झाली चूक, पांडुरंगा?

तुटलं घरटं, माजलं वारूळ
तुटलं घरटं, माजलं वारूळ
का दिलास डंख, पांडुरंगा?
का दिलास डंख, पांडुरंगा?
पाखराच्या सामोरी मांडुनी आभाळ



Credits
Writer(s): Dinesh Arjuna, Mandar Cholkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link