Bhimgiri

उठ वीरा तू, अरे, पेटव आता
उठ वीरा तू, अरे, पेटव आता
आग तुझ्या उरी

गांधीगिरीला संपव आता
दाखव भीमगिरी
ए, गांधीगिरीला संपव आता
दाखव भीमगिरी

अन्नासाठी उपोषणाचा करू नकोस कावा
(...करू नकोस कावा)
(...करू नकोस कावा)

लढणारा तू रणात आहे भीमरायाचा छावा
(...भीमरायाचा छावा)
(...भीमरायाचा छावा)

शिक्षणाचे, अरे, शस्त्र तुझे हे
शिक्षणाचे, ए, शस्त्र तुझे हे
आहे रे दुधारी

गांधीगिरीला संपव आता
दाखव भीमगिरी
अरे, गांधीगिरीला संपव आता
दाखव भीमगिरी

गर्जनाऱ्या त्या वाघाची तुझी रे चाल आहे
(...तुझी रे चाल आहे)
(...तुझी रे चाल आहे)

समशेर ही मनगटाची ही छाती ढाल आहे
(...ही छाती ढाल आहे)
(...ही छाती ढाल आहे)
रक्षेसाठी उंचेवरती, रक्षेसाठी उंचेवरती
उचल तू तलवारी

अरे, गांधीगिरीला संपव आता
दाखव भीमगिरी
अरे, गांधीगिरीला संपव आता
दाखव भीमगिरी

सत्ता काबीज तू कर आता होण्याआधी बरबादी
(...होण्याआधी बरबादी)
(...होण्याआधी बरबादी)

जळत्या घराणं लुटलं सारं नको ती आता खादी
(...नको ती आता खादी)
(...नको ती आता खादी)

सुख-दुःखाला, अरे, धावून आला
सुख-दुःखाला, अरे, धावून आला
भीम तो कैवारी

अरे, गांधीगिरीला संपव आता
दाखव भीमगिरी
अरे, गांधीगिरीला संपव आता
दाखव भीमगिरी
(दाखव भीमगिरी, दाखव भीमगिरी)



Credits
Writer(s): Adarsh Anand Shinde, Amol Kadam, Utkarsh Anand Shinde
Lyrics powered by www.musixmatch.com

Link