Aai

बाबासाहेब एकदा साताऱ्याला
माता भिमाईच्या समाधीजवळ गेले असता
समाधीला पाहून त्यांचे डोळे भरून आले
त्यांचा कंठ दाटून आला

लहानपणातच मातृप्रेमास मुकलेले बाबासाहेब
आपले सहकारी दत्तोबा पवार यांच्यासोबत
आपल्या आईबाबत बोलताना
तिच्या आठवणीत हरवताना

फौलादी भिमराव अगदी लहान लेकरू होऊन
ठसा-ठसा रडले
जणू ते आपल्या आईला साद घालून बोलत होते
आई, जाण्याची का तू केलीस घाई?
का आई तू थांबलीस नाही? तू थांबलीस नाही?

जाण्याची का तू केलीस घाई?
तुझ्या भेटीला आलो गं आई
जाण्याची का तू केलीस घाई?
तुझ्या भेटीला आलो गं आई

ज्ञान, वैभव हे पाहण्यास माझे
ज्ञान, वैभव हे पाहण्यास माझे
का आई तू थांबलीस नाही?
आई, आई, आई, आई, आई, आई

पाठीवरच बिऱ्हाड होतं आपलं
त्यात साऱ्यांना प्रेमानं जपलं
उभ आयुष्य कष्टात खपलं
तेज संसारी कधी ना ते लपलं

आम्हा भावंडांची दुधावरची साई
आम्हा भावंडांची दुधावरची साई
का आई तू थांबलीस नाही?
आई, आई, आई, आई, आई, आई

शिकलो आई खूप मी, जागवून झोप मी
झोपलेल्या बांधवांचे होईन नवे रूप मी
मुकलो तुझ्या प्रेमाला तरी तुला देतो ग्वाही
हीन-दीन पोरख्यांची होईन मी आई, भिमाई

लेखणीची माझ्या बनलीस शाई
लेखणीची माझ्या बनलीस शाई
का आई तू थांबलीस नाही?
आई, आई, आई, आई, आई, आई

आईविना जगणं कठीण असतं
जगणं कसलं ते जगणंच नसतं
तुझी थोरवी शब्दात नाही
लिहिले आता मी कितीही काही

जपले तुला माझ्या काळजाच्या ठायी
जपले तुला माझ्या काळजाच्या ठायी
का आई तू थांबलीस नाही?
आई, आई, आई, आई, आई, आई



Credits
Writer(s): Adarsh Anand Shinde, Amol Kadam, Utkarsh Anand Shinde
Lyrics powered by www.musixmatch.com

Link