Vadal Vara Sutala Ga - Lofi

Oh! Nishael, dropped another one!

वादल वारं सुटलं गो
वादल वारं सुटलं गो
वाऱ्यानं तुफान उठलं गो
वाऱ्यानं तुफान उठलं गो

भिरभिर वाऱ्यात, पावसाच्या माऱ्यात
सजनानं होडीला पाण्यात लोटलं

वादल वारं सुटलं गो
वाऱ्यानं तुफान उठलं गो

गडगड ढगात बिजली करी
फडफड शिडात धडधड उरी
गडगड ढगात बिजली करी
फडफड शिडात धडधड उरी

एकली मी आज घरी बाय
संगतीला माझ्या कुणी नाय
एकली मी आज घरी बाय
संगतीला माझ्या कुणी नाय

सलसल माडांत, खोपीच्या कुडात
जागणाऱ्या डोल्यात सपान मिटलं

वादल वारं सुटलं गो
वाऱ्यानं तुफान उठलं गो

सरसर चालली होडीची नाळ
दूरवर उठली फेसाची माळ
सरसर चालली होडीची नाळ
दूरवर उठली फेसाची माळ

कमरेत जरा वाकूनिया
पाण्यामंदी जालं फेकूनिया
कमरेत जरा वाकूनिया
पाण्यामंदी जालं फेकूनिया

नाखवा माझा, दर्याचा राजा
लाखाचं धन यानं जाल्यात लुटलं

वादल वारं सुटलं गो
वाऱ्यानं तुफान उठलं गो
वादल वारं सुटलं गो
वाऱ्यानं तुफान उठलं गो



Credits
Writer(s): Shanta Shelke, Hridaynath Mangeshkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link