Radha Hi Bawari

रंगात रंग तो श्यामरंग पाहण्या नजर भिरभिरते
ऐकुन तान, विसरून भान ही वाट कुणाची बघते?
रंगात रंग तो श्यामरंग पाहण्या नजर भिरभिरते
ऐकुन तान, विसरून भान ही वाट कुणाची बघते?

त्या सप्तसुरांच्या लाटेवरूनी साद ऐकुनी होई
राधा ही बावरी, हरीची राधा ही बावरी
राधा ही बावरी, हरीची राधा ही बावरी

हिरव्या-हिरव्या झाडांची पिवळी पाने झुलताना
चिंब-चिंब देहावरुनी श्रावणधारा झरताना
हा दरवळणारा गंध मातीचा मनात बिलगून जाई
हा उनाड वारा गूज प्रीतीचे कानी सांगून जाई

त्या सप्तसुरांच्या लाटेवरूनी साद ऐकुनी होई
राधा ही बावरी, हरीची राधा ही बावरी
राधा ही बावरी, हरीची राधा ही बावरी

आज इथे या तरूतळी सूर वेणूचे खुणावती
तुज सामोरी जाताना उगा पाऊले घुटमळती
हे स्वप्न असे की सत्य म्हणावे, राधा हरखून जाई
हा चंद्र-चांदणे ढगाआडुनी प्रेम तयांचे पाही

त्या सप्तसुरांच्या लाटेवरूनी साद ऐकुनी होई
राधा ही बावरी, हरीची राधा ही बावरी
राधा ही बावरी, हरीची राधा ही बावरी

रंगात रंग तो श्यामरंग पाहण्या नजर भिरभिरते
ऐकुन तान, विसरून भान ही वाट कुणाची बघते?
रंगात रंग तो श्यामरंग पाहण्या नजर भिरभिरते
ऐकुन तान, विसरून भान ही वाट कुणाची बघते?

त्या सप्तसुरांच्या लाटेवरूनी साद ऐकुनी होई
राधा ही बावरी, हरीची राधा ही बावरी
राधा ही बावरी, हरीची राधा ही बावरी
राधा ही बावरी, हरीची राधा ही बावरी
राधा ही बावरी, हरीची राधा ही बावरी

Credits
Writer(s): Patki Ashok, Patki Govind
Lyrics powered by www.musixmatch.com

Link