Aahe Maja

आहे मजा जगण्यात या
आल्या क्षणी हसण्यात या
हो, अंधाऱ्या रात्रीलाही
आशेचे लुकलूकणारे
तारे किती हे सांग ना?

हो, आहे मजा जगण्यात या
आल्या क्षणी हसण्यात या

किरणांच्या सरकती रांगोळ्या कोणासाठी?
का थेंब हे थिरकती पागोळ्या होण्यासाठी?
किरणांच्या सरकती रांगोळ्या कोणासाठी?
का थेंब हे थिरकती पागोळ्या होण्यासाठी?

साऱ्या खुणा कळतात या
माझ्याकडे वळतात या
हो, अंधाऱ्या रात्रीलाही
आशेचे लुकलूकणारे
तारे किती हे सांग ना?

हो, आहे मजा जगण्यात या
आल्या क्षणी हसण्यात या

उडती रे गगनी या हे पक्षी कोणासाठी?
पाण्यावरी तरंगते ही नक्षी कोणासाठी?
उडती रे गगनी या हे पक्षी कोणासाठी?
पाण्यावरी तरंगते ही नक्षी कोणासाठी?

दाही दिशा माझ्याच या
माझ्याच मी धुंदीत या
हो, अंधाऱ्या रात्रीलाही
आशेचे लुकलूकणारे
तारे किती हे सांग ना?

आहे मजा जगण्यात या
हो, आल्या क्षणी हसण्यात या
आहे मजा जगण्यात या
आल्या क्षणी हसण्यात या



Credits
Writer(s): Ashok Govind Patki, Milind Milind
Lyrics powered by www.musixmatch.com

Link